जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Thursday 6 January 2011

साँदेश

इंग्रजी नववर्षाच्या सर्व आंतरजालिय स्नेह्यांना शुभेच्छा !!!
म्हटलं या वर्षाची सुरवात एखाद्या गोड पाककृतीनं करावी. त्यात आज बाबांचा वाढदिवसही आहे. म्हणुन ही पाककृती खास त्यांच्यासाठी.

साहित्यः

प्रमाण साधारण १० साँदेशसाठी.


दिड लिटर दुध.
१ वाटी पीठी साखर
२-३ मोठे चमचे व्हिनेगर / लिंबाचा रस / दह्याचं पाणी (यापैकी काहीही एक)
केशर,पिस्ता /पाकातली चेरी/अननस/आंबा (जे हाताशी असेल ते)

कृती:




सर्वप्रथम दुध एका मोठ्या कढईत/भांड्यात तापवुन घ्या.
एक उकळी आली की आच मंद करुन, त्यात व्हिनेगर/ लिंबाचा रस / दह्याचं पाणी घालुन दुध फाडा.
कलथ्यान ढवळत रहा. पनीर तयार होतान दिसेल.



चाळणीवर स्वच्छ कापड आंथरुन घ्या.




फाटलेल दुध या चाळणीत टाकुन त्यावर लगेच बर्फाच गार पाणी टाकुन पनीर धुवुन घ्या.
थंड पाण्यामुळे पनीर मऊ होतं.



वाटल्यास वरुन वजन ठेउन पनीर मधल सगळ पाणी काढुन टाकाव.
पनीर हाताने कणिक तिंबतात तस तिंबुन घ्याव. (बोटांना पनीरचे छोटे छोटे गोळे लागता कामा नये.)
यासाठी खुप मेहेनत घावी लागते. श्रम वाचवायचे असल्यास १/२ मिनिट मिक्सर मध्ये फिरवल तरी चालेल. पण जास्त फिरवल तर पार लोळागोळा होईल. तेव्हा जरा जपुन. :)


मग त्यात पिठीसाखर घालुन नीट मळुन घ्याव.




किंचीत पाणी आहे अस जाणवल्यास कढई मंद आचेवर ठेउन तयार पनीरचा गोळा त्यात थोडावेळ परतावा.

मिश्रण थोडं गार झाल्यावर हातावर पेढे वळुन किंवा साचे असल्यास साच्यात टाकुन आकार द्यावा.
मध्ये बोटाने थोडा दाब देउन खड्डा करावा. त्यात केशर मिश्रीत दुधाचं बोट लावुन वरुन सजावटीचे जिन्नस टाकावे.


8 comments:

  1. Aaj doodh faaTala. kashaane maahiti naahi. tyaamuLe aaj saundesh karen mi. :)

    Just FYI : KeL fulache kabaab kele... mast zaale.
    fakt mi pattice chaa aakaar denyaa aivaji muTake (ovel shape) kele. chhan jhaale hote.
    Dhans!

    ReplyDelete
  2. प्राजुताई कसे झाले होते गं साँदेश ?

    धन्यवाद संजय :)

    ReplyDelete
  3. नविन वर्षाच्या सुरवाती या गोड पदार्थाने केलीस, ती ही खास बाबांच्या वाढदिवसाने .. क्या बात है.. पटकन उचलून तोंडात टाकावासा वाटतोय रे..

    ReplyDelete
  4. हाय प्रतिक,
    तुझ्या रेसिपीज खुप छान आहेत आणि सगळ्यात छान म्हणजे प्रत्येक स्टेजचे फोटो टाकले आहेस त्याने वाचायला अन पहायला धमाल आली आणि त्या मागची मेहेनतही जाणवली. स्वंयपाक करणे हा माझाही अतिशय आवडता उद्योग आहे अन नवीन प्रयोग करत रहाणे हा माझा छंद आहे, त्यामुळे तुझं लिखाण माझ्यापर्यंत नीट पोचलं. असाच नवीन काहितरी शोधत रहा. धन्यवाद!
    वंदना केंभावी

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Sondesh ase bantat? Worth trying recipe..

    ReplyDelete