गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही. माझा ब्लॉग?
हौसे खातर थातुर मातुर पाककृत्या करणार्या मला आंतरजाला वरील काही स्नेह्यांनी पाककृतींचाच ब्लॉग काढायचं सुचवलं. आज करु-उद्या करू असं करत मी टाळत होतो. कारण मी अनेक ब्लॉग पाहिले होते की जिथे मंडळी उत्साहात सुरवात तर करतात पण मग महिनोंन महिने / वर्षे काही लिहितच नाहीत. माझं ही तसचं काहिस होईल अशी भिती मनात होती.
एके दिवशी राजे स्वतःच मला म्हणाला हवं तर मी तुला ब्लॉग बनवून देतो. तु फक्त हो म्हण. त्याचा हा माझ्या वरचा विश्वास माझा मलाच हुरुप देउन गेला. आणि बरोब्बर गेल्या वर्षी याच दिवशी खा रे खा चा जन्म झाला.
राजेने लागेल तशी मदत केलीच. प्राजू ताई आणि माझ्या ताईने मला या ब्लॉगसाठी एकदम समर्पक नाव सुचवलं. नाताळची सुट्टी होतीच हाताशी धडाधड सगळ्या जुन्या पाककृत्या टाकण्याचा सपाटा लावला.
मित्रं मंडळींना ब्लॉगचं रुप रंग आवडलं. त्यांनी त्यांच्या मित्रांकडे चार कौतुकाचे शब्द काढले. खवय्या तात्याने तर चक्क त्यावर एक लेखच लिहून प्रकाशित केला. एका दिवसात जवळ जवळ ५०० हिट्स् मिळाल्या. एकदम खुश झलो. अहो सामान्य माणुस मी. आपल्या कामाचं कौतुक झालेलं कुणाला नको असतं. १०००, १०,०००, २०,००० असे टप्पे पार होत होते. दरम्यान नवीन पाककृती येतच होत्या. आज एका वर्षा नंतर जवळ पास ८० पाककृत्या झाल्या आहेत. आणि तब्बल ४२,६०० हिट्स. यात सर्व मिपाकर, मीमकर, बझकार, अन्य ब्लॉगर्स आणि मायबोलीकरांचा मोलाचा वाटा आहेच. तुम्हा सर्वांचे आभार मानून मला तुमच्या ऋणांतुन मुक्त व्हायचं नाही कारण तुमचा हा लोभ मला असाच हवाय.
माझ्यासाठी तेच उत्तेजक आहे.
नतमस्तक

तू फ़क्त एक वर्षाचा आहेस खा रे खा????
ReplyDeleteआणि मला वाटत होतं आधी का नाही मला सगळया पाकृ मिळाल्या ज्या मी ट्राय करू शकले असते.....:)
खूप खूप अभिनंदन..आणि हो या ब्लॉगबद्दल खरं तर आम्ही तुझ्या ऋणात राहायला हवं.....
धन्यवाद अपर्णा. :)
ReplyDeleteगेल्या वर्षभरात खूप वेळा म्हणून झाले आहे पण आज पुन्हा बोलतो...
ReplyDeleteगणपा तुस्सी ग्रेट हो...
खाण्याची आणि खिलवण्याची आवड असणार्या लोकांसाठी तुम्ही म्हणजे हिरो आहात. तुम्ही दिलेल्या दोन मांसाहारी पाककृत्या बनवून पाहिल्या. तुमची फोटोंसकट साध्या सोप्या भाषेत पाककृत्या लिहिण्याची हातोटी निव्वळ लाजवाब. केवळ तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मी प्रथमच माझ्या ब्लॉगवर पाककृतीची पोस्ट टाकली. तुम्ही अश्याच चविष्ट, मसालेदार, चमचमीत पोस्ट लिहीत राहाल याची खात्री आहे. तुम्हाला आणि खा-रे-खा ब्लॉगला खूप खूप खादेच्छा.
आणि हो तुम्हाला ब्लॉग सुरू करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल राजे आणि तुमच्या दोन तायांचे मन:पूर्वक आभार...
धन्यावाद सिध्दार्थ. :) तुझ्या ब्लॉगची लिंक दे की.
ReplyDeleteअभिनंदन प्रतिक!
ReplyDeleteतुझा ब्लॉग खूप छान आहे, मला तुझ्या पाककॄती खूप छान वाटल्या आणि फोटॊंनी त्यांची मजा वाढवली. खाणं डोळ्यांना आवडलं की करुन खाऊ घालावस वाटत ना, म्हणून पण आवडला. आम्ही "आकाशवाणी सिडनी" वर निरनिराळे कार्यक्रम करतो तेव्हा कधी तरी तुझ्या ब्लॉगचा उल्लेख केला तर चालेल ना? जास्तीतजास्त लोकांपर्यंत तुझा हा खटाटोप पोहोचवता आला तर मला खूप आनंद होइल. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
वंदना
धन्यवाद वंदना.
ReplyDeleteतुम्हाला ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला. :)
तुम्ही तुमच्या कार्यक्रमात जरूर उल्लेख करु शाकाता.
Apratim ahe ha blog .....Me khup thikani tumachya blog chi prasidhi karun takliy... Khup thikani mhanaje ,Bahini maitrin ani ofchya coligue madhye :)
ReplyDeleteधन्यवाद अश्विनी. :)
ReplyDeleteठाकूरसाहेब.....
ReplyDeleteशाकाहारीमधे पंजाबी रेसेपी मीळू शकतील का ?
Sagar