काय, तोंडाला पाणी सुटलं की नाही नाव वाचुनच?
माझंही असच होतं खेकड्याचं नाव काढलं की. काल मस्त मोठ्ठे खेकडे मिळाले. म्हटल नेहमीच्या कालवणापेक्षा आज काही वेगळं करुन पहावं. मागे एका जालीय मैत्रीणीच्या जालनीशीवर तंदूर खेकड्याचे फोटो पाहिले होते. म्हटलं चला हेच करुन पहावं.
मंडळी तस ही पाककृती करायला एकदम सोप्पी कमी वेळ काढू आहे. पण तरी तुमच्याकडे वेळ मुबलक हवा. अहो चवीने खायचं तर तेवढी फुरसत हवीच.
चला तर लागुया तयारीला......
साहित्यः
मोठे खेकडे. जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात.
४ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
३ मोठे चमचे तंदूर मसाला.
२ मोठे चमचे काश्मीरी लाल तिखटं. (वस्त्रगाळ केलं असल्यास उत्तम रंग येतो.)
मीठ चवीनुसार. (खेकडे गोडुस असतात त्या प्रमाणे कमी जास्त प्रमाण ठरवावे.)
२ चमचे तेल. (ऑलिव्हचं त्यातल्या त्यात हृदयासाठी बरं.)
कृती:
खेकड्याचं कवच काढुन त्याचे कल्ले (गिल्स्) काढुन टाकावे.वहात्या पाण्याखाली स्वछ धुवून घ्यावे.
फांगडे / नांग्या तोडून वेगळ्या कराव्या. खेकडे मोठे असतील तर मधो मध कापून २ तुकडे करावे.
खलबत्त्याच्या दांड्याने फांगडे किंचींत ठेचावे म्हणजे मीठ मसाला आत शिरू शकेल.
दही, मीठ, तेल, मसाला, लाल तीखट एकत्र करुन घ्यावं.
खेकड्याच्या प्रेत्येक तुकड्याला त्यात घोळवून नंतर फ्रीज (फ्रीजर्मध्ये नाही) मध्ये ३० मिनीटे मुरत ठेवावं.
अर्ध्या तासानंतर बेकिंग ट्रेला अॅल्युमिनियमची फॉईल लावुन त्यावर सर्व तुकडे पसरवून ठेवावे.
ओव्हन १८०° C वर तापमान ठेवून खेकडे अॅल्युमिनियमच्या फॉईलने झाकून १०-१५ मिनीटे शिजवावे.
१०-१५ मिनीटांनंतर वरुन ठेवलेली अॅल्युमिनियम फॉईल काढुन टाकावी. आणि अजुन १०-१५ मिनीटे शिजवावे. मध्येच एकदा तुकडे वर खाली करुन बाजू बदलावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबाच्या फोडींनी सजवून गरमा-गरम सर्व्ह करावं.

haye re kismat!!!! baghun tondala paani sutale....chidava chidava dushtanoooo !!
ReplyDelete"chidava chidava dushtanoooo"
ReplyDeleteअग अगदी हेच विचार अनुजाच्या 'उसाटगिरी'मधले फोटू पाहून मनात आलं होत. म्हणून मग म्हटलं आपणच आपल्या जिभेचे चोचले पुरवावेत. ;)
superb!
ReplyDeleteworth giving a try!!
प्रतिक आता मझी अवस्था तुझ्या सारखीच झाली आहे पाणीच पाणी
ReplyDeleteअनुजा याचं श्रेय तुलाच. :)
ReplyDelete