साहित्यः

१ मध्यम कांदा आडवा चिरलेला.
१ मध्यम भोपळी मिरची लांबट उभी चिरलेली. (ज्युलियन्स.)
१ लहान गाजर लांबट उभे चिरलेले. (ज्युलियन्स.)
पातीचा कांदा सजावटीसाठी.
१ इंच आल्याचे ज्युलियन्स.
४-५ लसुण पाकळ्या बारीक चिरलेल्या.

१/२ वाटी कणिक.
१/२ वाटी मैदा.
२ अंड्यांतला पांढरा भाग.
१/२ वाटी ताक.
लाल तिखटं. मीठ चवी नुसार.
ब्रेडचा चुरा.

१/२ किलो चिकन (शक्यतो बोनलेस) लहान तुकडे करुन.
१ चमचा आलं-लसुण पेस्ट.
कृती:

चिकनला आलं-लसणाची पेस्ट, मीठ, आणि लाल तिखटं लावुन १० मिनिटे मुरत ठेवावं.

एका झिप लॉकच्या पिशवीत कणिक, मैदा, लाल तिखट एकत्र करुन त्यात चिकनचे वर मुरवलेले तुकडे टाकुन नीट एकत्र कराव.

ताक आणि अंडी फेटुन एका बशीत काढुन घ्यावं. दुसर्या बशीत ब्रेडचा चुरा ठेवावा.
ओव्हन २५० °C वर तापत ठेवावा. ट्रेला अॅल्युमिनियम फॉइल लावुन वरुन तेलाचा स्प्रे मारावा.
चिकनचा एक एक तुकडा आधी अंड्यात बुडवुन मग ब्रेडच्या चुर्यात घोळवुन ट्रे मध्ये ठावावा.
१५-२० मिनिटे. बेक करावं.
(ओव्हन नसेल तर तेलात तळुन घेतले तरी चालतील.)

एका कढईत थोड्या तेलावर आल लसुण आणि मिरची परतुन घ्यावी.

त्यात कांदा आणि भोपळी मिरची टाकुन १ मिनिट नीट परतुन घ्यावं.

मग त्यात पाती कांदा, गाजर, चीली सॉस्/ केचप टाकुन मोठ्या आचेवर १ मिनिट परतावे.
भाज्या पुर्ण शिजवु नयेत. करकरीतपणा राहिला पाहिजे.

नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकुन परत १ मिनिटं मोठ्या आचेवर परतावे.
वरुन पाती कांद्याने सजवुन गरमागरमच वाढावं.