सध्या मिपाचे धुरंधर बल्लव आणि अन्नपुर्णा एकदम फुल्टू जोमात आले आहेत. त्यांचा दांडगा उत्साह पाहुन मृतवत असलेल्या आमच्या उत्साहाला पालवी न फुटती तर नवलंच.
त्यामुळे तो उत्साह मावळायच्या आत, घरात जे काही पदार्थ सापडले त्यांचा उपयोग करुन हे कडबोळं केलेलं आहे. वर पाककृतीचं नाव 'कुंग पाऊ चिकन' असलं तरी मुळ पाककृती अगदी १००% अश्शीच असते असा माझा बिल्कुल दावा नाही. काही पदार्थ कमी जास्त झाले असतील तर तो अपराध उदार मनानं पोटात घ्याल अशी खात्री आहे.
चला तर घरात काय काय कच्चा माल सापडला ते पाहू....
श्वेत वारुणी (व्हाईट वाईन), तिळाचं तेल, सोया सॉस, व्हिनेगर, (प्रत्येकी २-३ मोठे चमचे)
प्रत्येकी एक कांदा, भोपळी मिरची मोठे कापलेले.
पातीचा कांदा, लसुण, आलं, भाजलेले शेंगदाणे (मुठभर)
२ लाल सुक्या मिरच्या. तीळ, साखर, कॉर्न स्टार्च.
चवी नुसार मीठ.
हो आणि मुख्य म्हणजे (बोनलेस) चिकन साधारण १/२ किलो.
(एकवेळ एखाद्या इमामाच्या घरात कुराणाची प्रत नाही सापडायची पण या गणाच्या घरात चिकन सापडणार नाही, ये कदापी हो नही सकता.
-इति. आमचे मित्रगण.)
असो.
सगळ्यात आधी चिकनचे मध्यम आकारेच तुकडे करुन ते स्वच्छा धुवून, निथळवून घेतले. त्यात प्रत्येकी १ मोठा चमचा तिळाचं तेल, सोयासॉस, व्हिनेगर, वाईन, कॉर्न स्टार्च, किंचीत मीठ हे सगळे जिन्नस मिसळुन, चिकन झाकून फ्रीजमध्ये २०-३० मिनीटं मुरत ठेवलं.
दुसर्या एका बाऊलमध्ये उरलेलं तिळाचं तेल, सोयासॉस, व्हिनेगर, वाईन, कॉर्न स्टार्च, कोल्हापुरी ठेचा (हा आयत्यावेळी घातला) हे सगळं एकत्र करुन घेतलं.
एका नॉन्स्टीकच्या भांड्यात चमचा भर तेलात थोडं आलं-लसुण परतुन, मुरवलेलं चिकन मध्यम आचेवर शीजवून घेतलं.
चिकन शिजल्यावर ते एका दुसर्या भांड्यात काढुन त्याच कढईत, बारीक चिरलेलं आलं लसुण, लाल मिरची परतुन घेतली.
आलं लसणाचा खमंग वास आल्यावर मग त्यात कांदा आणि भोपळी मिरची टाकुन परतुन घेतलं. कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात वर तयार केलेलं मिश्रण टाकून आच मंद करुन परतलं. अगदीच सुकं सुकं झाल्याने खाली लागेल की काय या भितीनं किंचीत पाणी घातलं.
साधारण एक हलकीशी उकळी आल्यावर मग त्यात चिकन आणि कांद्याचीं पातं घातली. हलक्या हाताने सगळं एकत्र केलं.
वरुन भाजलेले शेंगदाणे, तिळ टाकाले.
.
गरमागरम न्युड्लस सोबत ओरपायला घेतलं.
वाटल्यास फ्राईड राईस सोबतही वाढता येईल.
loved this recipe. ll try at home.
ReplyDelete