जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday, 26 November 2011

बनाना लीफ ग्रीन चिकन

राम राम मंडळी.
दिवाळीच्या सुट्टी नंरत आमची ही पहिली पाककृती.
महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही.
आता परत येरे माझ्या मागल्या.
आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं.
फार काही कटकटीचं नाही.





४-५ मोठे चमचे हिरवं वाटण. (यात भरपूर कोथिंबीर + ४-५ हिरव्या मिरच्या + ४-५ पाकळ्या लसुण + १" आलं + एका लिंबाचा रस.)
१/२ चमचा हळद.
२ चमचे मसाला.
२ चमचे ऑलिव्हचं तेल.
मीठ चवी नुसार.
एका लिंबाचा रस.



१/२ ते ३/४ किलो चिकन.



चिकन स्वच्छ धुवून चाळणीत ठेऊन निथळवून घ्यावं. त्यात हळद, मसाला, मीठ आणि वाटण टाकुन चांगले एकत्र करुन घ्यावं.



केळ्याच्या पानात वरील मसाला लावलेले चिकन गुंडाळुन, बेकिंगच्या भांड्यात ठेवावं.
वरुन अ‍ॅल्युमिनीयमची फॉईल लावून हवाबंद करावं.
ओव्हन २५० ते २७५° C वर ठेउन ४० ते ४५ मीनिटे शिजवावे.



४० ते ४५ मीनिटां नंरत अ‍ॅल्युमिनीयम फॉईल आणि  केळीची पानं काढून अजुन ८-१० मिनिटे ग्रील मोड वर शिजवावं.


1 comment: