जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Wednesday, 19 October 2011

कॅरमलाईज्ड चिकन

             कालच विजुभौंनी एक खरड केली होती की नॉन व्हेज मध्ये गोड पदार्थ नसतात का? तर त्यांच्या या शंकेच निरसन करण्यासाठी म्हटल आपणच आधी एखादा पदार्थ बनवुन पहावा. झाला बरा तर मग कळवाव.
तस चिकन मटण म्हटलं की ते जर झणझणीत, मसालेदार नसेल तर मी फारसा त्याच्या वाटे जात नाही.
मी मधात घोळवुन रोस्ट केलेली कोंबडी नुसती बघितली आहे. पण ती चाखायची तेव्हा हिंमत झाली नव्हती. चिकन आणि ते ही गोड??? नोऽऽऽऽऽ वे.

             पुढेमागे जालावर फिरताना, काही टिव्ही वरचे कुकिंगचे कार्यक्रम पहाताना त्यात फळांच्या रसात मुरवुन वा शिजवताना फळांचे रस वापरुन केलेले काही नॉनव्हेज पदार्थही पाहिलेही. पण वाट वाकडी करुन तिथे जाण्याच धैर्य कधी झालं नाही.

             पण आज विजुभौंच्या निमित्ताने मुद्दाम वाट वाकडी केली आहे. नेहमीच्या झणझणीत चिकन पेक्षा जरा वेगळी चव. तुमच्या चिल्लर्पार्टीला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
दोन पदार्थ आहेत. एकात बेकन (डुक्कराच मांस) वापरलय तर एकात केवळ चिकन.

साहित्य : 




१/२ किलो बोनलेस चिकन. १ इंचाचे तुकडे केलेल.



१/४ ते २/३ वाटी ब्राउन शुगर. (चॉललेटी रंगाची साखर.)
१ चमचा आल पेस्ट.
१ चमचा लसुण पेस्ट.
२ चमचे भरड वाटलेली लाल मिर्ची किंवा चीली फ्लेक्स.
१ चमचा ऑलिव्हच तेल.
१/२ कप पाणी.

कृती :



चिकनला ओलिव्हच तेल, आल-लसुण पेस्ट आणि लालतिखट लावुन १५-२० मिनिटं मुरत ठेवाव.



नॉनस्टिकच्या कढईत साखर आणि १/४ कप पाणी टाकुन एक उकळी आणावी.



पाकाला उकळी आली की त्यात उरलेल १/४ कप पाणी आणि मुरवलेल चिकन टाकुन एकत्र करुन घ्याव.
वरुन एखाद झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
वाफ काढुन झाल्यावर झाकण काढुन, आच मंद करुन, उरलेल पाणी आटु द्याव.

गरमा गरमच असतानाच वाढाव.


~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

दुसरा प्रकार : (बेकन वापरुन.)


साहित्यः

३०० ग्रॅम बोनलेस चिकन. १ इंची तुकडे केलेल.



१/२ वाटी ब्राउन शुगर.
२ मोठे चमचे पेपरीका / नसल्यास लाल तिखटही चालेल.
२ चमचे ऑलिव्ह तेल.



बेकन.

कृती :



चिकनच्या तुकडयांना ऑलिव्हच तेल, साखर आणि पेपरिका मध्ये घोळवुन घ्याव.
१५- २० मिनिटे मुरत ठेवाव.




बेकनच्या पट्ट्यांनाही याच मिश्रणाचा लेप द्यावा.



एका पट्टीचे मधोमध कापुन २ तुकडे करावे. चिकनचा एक तुकडा मध्ये ठेवुन रोल करावा आणि आधारासाठी टुथपीकने टोचुन ठेवाव.



बेकिंग ट्रेला अ‍ॅल्युमिनियची शीट लावुन वरुन तेलाच बोट फिरवाव. त्यात हे रोल्स रचुन ओव्हनमध्ये २००° C वर ३० ते ४० मिनिटे शिजवावे. मध्ये एकदा वर खाली करावे.

या तर मग हाणायला बेकन चिकन.







9 comments:

  1. ठाकुर.....ये हाथ मुझे दे दे ठाकुर ,मुझे दे दे...:P

    कसला भन्नाट बनवतोस रे तु...जबरा एकदम.

    ReplyDelete
  2. नऽऽऽऽऽऽही.. ;)
    (मै ने पेहेलेही किसी और को कमीट किया है. और तुम तो मेरा नेचर जानती हो, की मै ने एक बार कमीटमेंट कर दी, फिर मै अपनी आप की भी नही सुनता ;))

    बादवे धन्स गं. :)

    ReplyDelete
  3. प्रतिक, इतक्या छान छान रेसिपी देतोस पण कोंबडीच्या फार मागे लागतोस बाबा..मला (आणि माझ्या नवऱ्याला) मटन बिर्याणीची खास तुझ्या style ची रेसिपी हवी आहे...मिळेल का?

    ReplyDelete
  4. अपर्णा मटण बिर्याणीची पाककृती आधीच दिली आहे.
    http://kha-re-kha.blogspot.com/2010/12/blog-post_926.html
    इथे पहा.

    ReplyDelete
  5. प्रतिक,
    ब्लॉगवर जरा लवकर फेरी मारली आणि एकदम दोन रेसिपीज..मस्त! मुलांना बेकन न चिकन दोन्ही आवडतं, गोड चालणार नाही, पण तरीही करुन पहाणार..कदाचित तिखटच करेन.
    छान! हनी चिकनही चांगल लागत, तू चाखून पहायला हरकत नाही. इथे सिडनी मधे सगळ्या देशांतील लोक असल्यामुळे खूप वेगळ्या चवीचे पदार्थ मिळतात, थाइ फूडमधे हनी चिकन अगदी हमखास मिळतं..चवही चांगली असते. नवीन रेसिपीची वाट पहातो आहोत...
    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. धन्यवाद वंदना.
    तुम्हाला आणि परिवाराला दीपोत्सवाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  7. Hi Pratik,
    Butter chikan dish sangtos ka plz...

    ReplyDelete