काय मंडली काय चाल्लावं? रैवारचं नल्ली बल्ली फोडलावं कं नाय? आज जल्ला आमच्या हतं मार्केट बंद. आन माजा फिरीज पन रोडावलता. त्यात हतं मिपावं एकाव-एक धागेकाडुन, मिपाशी कुक मंडली माजं डोस्कं फिरवुन रायली. जल्ला त्यातला एक पदार्थ घरान अशेल तर शप्पत. फिरीजमन डोकावलं ता एक वांगं तेवरंच भेटलं. आता ह्याचा काय कराचां म्हनुन थोडा डोस्कं खाजवलन. थोडं सामानाची जुलवा जुलवं केली नं ह्यो बग मीनी काय केला तं.
आवरलं असेन तर मंग कसं काय केला त सांगतव. वांगं आवरत नसेन तर इकरुनच कल्टी मारली तरी चालन.
सगल्यान पैलं तर वांगींभात मसाला आना मार्केटान. नय भेटला तरी वांदा नाय. मी सांगतं नं कसा बनवाचा तो..
२ मोठे चमचे चना डाल.
२ मोठे चमचे उडिद डाल.
२ चमचे धने (नसतीन तरं धना पुड)
३-४ लाल सुक्या मिरच्या (त्यावं नसतीन तर लाल तिखटं.)
१ छोटा चमचा मेथी दाने.
१ छोटा चमचा जीर.
१ छोटा चमचा खसखस.
थोडा हिंग.
२-३ वेलच्या.
दालचिनी १ इंच.
३-४ लौंगा
ह्ये जकलं कोरडंस भाजुन घ्याचं. (मिरची नं धने नसतीन तर त्या पावडरी गॅस बंद केल्यावं टाकाच्या.
सगलं गार झाल्यावं मिक्सरान टाकुन पाऊडर करुन घ्याची. (माजी मोठी माय त्यात सुकं खोबरं बी टाकाची. पन मंग तो मसाला जास्त दिस टिकाचा नाय, लगेच वापरावा लागाचा. म्हनून मीनी नाय घात्ला.)
वाटान घाटन झाला तं आता मेन डिशकडे वलु. पैले एक वाटी भात मोकला शीजवून घ्या. तुमाना बासमती आवरत असनं तर तो घ्या पण त्ये काय कंपल्सरी नाय. मीनी तर सादा कोलम घेतला. हा पण भात एकदम सुट्टा झाला पायजे. नाय तर वांग्याची खिचडी खावी लागल.
१ लहान चमचा मोहरी.
१-१ लहान चमचा चना डाल, उडीद दाल. (या दोनी १०-१५ मिनिट पान्यात भिजवाच्या.)
कडीपत्ता
३-४ हिरव्या मिरच्या.
१/२ चमचा हलद.
२ मोठे चमचे सुकं खोबरं.
थोडी चींच (आंबट आवडत असन तर.)
तमाल पत्र.
४-५ चमचे तेल.
मीठ.
येक वांगं. (लहान असतीन तर ५-६.)
१ कांदा बारीक चिरलेला.
सगल्यान पैले कढईत तेल तापवुन घ्यांच.
तेल तापलं की त्यान मोहरी, चनाडाल-उडीदडाल टाकाची. थोडं परतल्यावं त्यात कडीपत्ता मिरची कांदा तमाल पत्र टाकुन परतुन घ्याचं.
वांग्याच्या लहान फोरी करुन घ्याच्या. कांदा गुलाबी झाल्यावं मंग त्यात वांग्याच्या फोरी घालाच्या. थोडावेल शिजल्यावं मंग त्यात हलद घालाची.
वांगं शिजा लागलं की मंग त्यात ३ चमचे वांगी भात मसाला टाकाचा.
५ मिनटानी त्यात सुक खोबरं टाकाचं. आवरत असन तर मंग चींचेचा कोल टाकाचा. (पण चींच, वांग शिजल्या नंतरच टाकं हा बाला, नाय तर मग वांदा व्हाचा.) मीठ टाकांचं.
मसाला नं वांगं शिजलं की मंग त्यात शिजवलेला भात टाकुन एकत्र कराचा. झाकान लावून एक वाफ काराची.
मना तललेला वांग पण लय आवरतं. म्हनुन मग मी ४ वांग्याचे काप पन केले.
मंग कं बगतं कं बाला? येना जेवाला.

झकास वांगीभात रे गणपा. ते उजवीकडचे वांग्याचे ४ गोल तुकडे खूप छान दिसत आहेत.
ReplyDeleteअवांतरः मला वांग्याची भजी खूप आवडतात. तू खाली असशीलच. त्याची पण एक झकास पाककृती माझ्यासाठी दे ना तुझ्या ब्लॉगवर. माझ्या बायकोला त्याचा नक्की उपयोग होईन. :)
अरे किती म्हणजे किती जळवावं?? इतकेSSSSSS फोटू?? णी शे ढ !!! :)
ReplyDeleteसागर, हेरंब व्हिजीटवल्या बद्दल धन्स. :)
ReplyDeleteWhich camera do you use..I will like to buy it..Excellent recipe..Please come up with more delicious recipes..Cant wait for ur next post..Keep cooking:)♥
ReplyDeleteThanks for Visit Ffiona.
ReplyDeleteI have nikon p 510.
च्याबना. कवरा भारी रं. पक्का आवरला.
ReplyDeleteHee recipe try keli. Khoop avadli. Really appreciate your enthusiasm towards cooking. I often visit your blog when it's time to go home after a tiring day at work to look for something nice which I can cook within a short time. Do keep posting the good recipes. Thanks for sharing these.
ReplyDeleteब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि कौतुगोद्गार काढुन उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद प्राजक्ता. :)
ReplyDeleteतुमच्या कृतीने वांगीभात केला. मस्त झाला. वांग्याचे भरीत सोडून दुसरा प्रकार आवडत नसे. मसालाभातही आवडत नसे. आता वांगे खाण्याचा आणखी एक पर्याय मिळाला. धन्यवाद......भरत मयेकर
ReplyDeleteधन्यवाद भरत. :)
ReplyDelete