राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)
साहित्य :
अळंबी (मश्रुम्स) ,
सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(अंड न आवडणार्यांना अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळुन ते दाट मिश्रण वापरता येईल.)
तळण्यासाठी तेल.
कृती :
फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.
अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.
ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.
सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.
तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.
चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.
.
.
Wow pratik khupch chan tondala pani sutla. Vel aslyas majha blog visit ker.
ReplyDeleteधन्यवाद सुप्रीयाजी.
ReplyDeleteतुमच्या ब्लॉगची लिंक द्याल का?
mitraa to thor aahes :)
ReplyDeleteहे हे हे. संदीप थोर वैग्रे काही नाही. पण इथे चक्कर टाकल्याबद्दल धन्स. :)
ReplyDeletePratik, maala nuktach tumchya blog cha khajina sapadla ahe! Thanks a lot for sharing your recipes. Sarva recipes che presentation agdi professional ahe, kharach kitti kautuk karave titkech thode ahe.
ReplyDeleteHey mushrooms bake karta yeu shaktat ka? jar bake karayche asle tar kaay badal karave lagtil?
धन्यवाद प्रिती. :)
ReplyDeleteमश्रुम नक्कीच बेक करता येतील. थोड फार फिलिंगमध्ये बदल करता येईल. जे देठ काढून टाकलेत तेच बारीक चिरून + कांदा, आवडतं असल्यास उकडलेलं अंड थोडा मसाला वगैरे वापरून फिलिंग करून घ्यावं. त्यात थोडं चीज मिक्स करावं आणि ते या मश्रुममध्ये भरून बेक करावे. शेवटी वरून परत थोडं चीज भुरभूरून २ मिनिटं ग्रील मोड वर गरम करावं.
he kadhi takale te mahit nahi padale.
ReplyDeleteekach mhanen " Jiv gheto ka ?"