मध्यपुर्वेत
असताना (तेव्हाच्या)आम्हा बॅचलर लोकांच मधल्या वेळेतलं खाणं म्हणजे
शवर्मा(शोरमा). स्वस्त आणि मस्त. तेव्हा व्हेज शवर्माच्या वाटेला जरी फारसा
जात नसलो तरी मला फलाफील फार आवडायचे. नुसते फलाफील आणि सोबतीला डीप
म्हनुन हमुस बस, एका बैठकीत ७-८ रिचवले की पोटभरू काम व्हायचं.
साहित्य :
ताहिनी सॉससाठी.
अर्धी वाटी ताहिनी.(तिळाची पेस्ट)
लिंबाचा रस.
३-४ लसणाच्या पाकळ्या.
थोडीशी पार्सली.
मीठ चवी नुसार.
फलाफीलसाठी.
१ वाडगा काबुली चणे (रात्रभर भिजवलेले.)
१ मोठा कांदा.
२ हिरव्या मिरच्या.
बचकाभर पार्सली.
२ मोठे चमचे मैदा.
१ मोठा चमचा भाजलेल्या जीर्याची पुड.
१ मोठा चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती :
एका भांड्यात ताहिनी आणि लिंबाचा रस फेटुन घ्यावा. प्रवाहीपणासाठी गरजे नुसार पाणी घालावे.
लसुण आणि पार्सली बारीक चिरुन टाकावे. चवी प्रमाणे मीठ घालावं
हा झाला सॉस तयार.
फलाफील.
काबुली चणे, कांदा, मिरच्या, पार्सली सगळं फुडप्रोसेसरमध्ये घालुन भरड वाटावं. (फुडप्रोसेसर नसल्यास मिक्सर ही चालेल पण अगदिच पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.)
नंतर त्यात मैदा, जीरे-काळिमीरी पुड आणि मीठ टाकुन एकत्र करावं.
तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.
हे फलाफील नुसतेच हमूस सोबत चापता येतील.
जर घरात खूबूस/पीटा ब्रेड असेल तर व्हेज शवर्मा बनवायला वेळ नाही लागायचा.
शवर्मा :
खूबूस / पीटा ब्रेड.
फलाफील.
लेट्युस, टॉमेटो चिरलेले.
ताहिनी सॉस.
फ्रेंच फ्राईज.
खूबूस / पीटा ब्रेड अर्धवट उघडुन घ्यावा. २-३ फलाफील कुस्करुन घ्यावे. टॉमेटो, लेट्युस फ्रेंच फ्राईजचे तुकडे करुन ते घालावे. वरुन ताहिनी सॉस घालावा आणि त्याचा रोल करुन सर्व्ह करावा.
हे गरम गरम असताना खाण्यातच मजा.

चिकन शवार्माची मजा नाय पण व्हेजला.
ReplyDeleteखरंय. तयार आहे ती ही. टाकतो पुढल्या आठवड्यांत ;)
ReplyDeleteवा ! तेल-अव्हिव्हला खाल्लेल्या फलाफलची चव आठवली ... धन्यू !
ReplyDelete--
जातीवंत भटका
धन्स अमोलराव,पंकज.
ReplyDelete